Sunday, July 21, 2024

कुख्यात गुंडाकडुन सत्कार घेत खा. लंकेंनी केला सेल्फ गोल… विरोधकांच्या हातात आयते कोलीत…

कुख्यात गुंडाकडुन सत्कार घेत खा. लंकेंनी केला सेल्फ गोल… विरोधकांच्या हातात आयते कोलीत…

नगर: नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे जाएंट किलर ठरले. खासदार झाल्यानंतर त्यांच्या विजयाची दखल राज्याने घेतली. सर्वसामान्य कुटुंबातील एक साधा माणूस दिल्लीला संसदेत पोहचला याचे अप्रूप आणि कौतुक सर्वांनीच केले. पण खासदार होऊन अजून लोकसभेत शपथ घेतली नाही तोच खासदार लंके एका कृतीने टिकेचे धनी ठरले आहेत. पुण्यात असताना त्यांनी कुख्यात गुंड गजा मारणेच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांचा पाहुणचार, सत्कार अतिशय हसतमुखाने स्विकारला. विरोधक यानंतर खासदार लंकेंवर अक्षरशः तुटून पडले आहेत. निवडणूक काळातही लंके यांच्यावर दहशत, गुंडागर्दीचा आरोप होत होता. त्याला आता आणखी धार आली आहे. विरोधकांच्या टिकेनंतर खासदार लंके यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आपण मारणेनी सहज हात केला म्हणून त्यांच्या घरी गेलो असा अजब गजब खुलासा त्यांनी केला. पण तो इतक्या सहज पचनी पडणारा अजिबात नाही हेही तितकेच खरे आहे. खासदार म्हणून अजून लंके यांना कुठे सुरुवात करायची आहे. अशा वेळी जाणीवपूर्वक निर्माण केलेली वेगळी प्रतिमा तितक्याच ताकदीने सांभाळणे महत्वाचे ठरणार आहे. सोशल मीडियावर आता काही लपून राहू शकत नाही ‌ याची जाणीव ठेवून खासदार ल़ंके यांनी वाटचाल करून नगरच्या जनतेला दिलेली विकासाची आश्वासने पूर्ण कशी होतील यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत अशीच चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles