नागरिकांच्या आरोग्याविषयी निलेश लंके यांची तळमळ; ग्राउंड लेवलवरच्या समस्यांचे स्वतः निरीक्षण
*दिनांक:* 8 ऑगस्ट 2024
*स्थान:* अहमदनगर
अहमदनगर महानगरपालिका हद्दीत वाढलेल्या रोगराईवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मा. आयुक्त अहमदनगर महानगरपालिकेस पत्र
अहमदनगर महानगरपालिका हद्दीत पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे रोगराई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि पाणी साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, टायफॉइड यांसारख्या रोगांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
या रोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्यापूर्वी त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी शहर आणि उपनगरांमध्ये महानगरपालिका हद्दीत नियमितपणे डास निर्मूलन फवारणी करावी, तसेच रोगजन्य संसर्ग निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
अहमदनगरचे खासदार निलेश लंके स्वतः नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत. याआधीच्या कोणत्याही खासदारांनी सामान्य नागरिकांच्या अशा समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले नव्हते. निलेश लंके यांना नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी असून त्यांनी महानगरपालिकेने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या उपाययोजनांसाठी महानगरपालिकेने तात्काळ योग्य त्या कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा.