अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल उभारणीसाठी निधी मिळावा यासाठी खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय डॉ. श्री. मनसुख मांडवीया यांची भेट घेतली.
या भेटीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.भास्कर भगरे यांचीही उपस्थिती होती. या वेळी खासदार लंके यांनी मंत्री मांडवीया खालीलप्रमाणे निधीची मागणी केली:
1️⃣ अहिल्यानगर शहर वाडिया पार्क जिल्हा खेळ संकुल- ₹20 कोटी
2️⃣ पारनेर तालुका क्रीडा संकुल – ₹5 कोटी
3️⃣ श्रीगोंदा तालुका क्रीडा संकुल – ₹5 कोटी
4️⃣ कर्जत तालुका क्रीडा संकुल – ₹5 कोटी
5️⃣ जामखेड तालुका क्रीडा संकुल- ₹5 कोटी
6️⃣ शेवगाव तालुका क्रीडा संकुल – ₹5 कोटी
माननीय डॉ. श्री. मनसुख मांडवीया यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निधी मंजूर करून संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
हा निर्णय क्रीडा क्षेत्राला बळकटी देऊन युवकांच्या कौशल्यविकासासाठी नवीन संधी निर्माण करेल.