Sunday, July 14, 2024

खा.निलेश लंकेंचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र..पोलिस भरतीबाबत महत्वाची मागणी

१९ जून पासून राज्यात सर्वत्र सुरु होत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस चालक, जेल पोलीस आणि SRPF भरतीतील मैदानी परिक्षेच्या तारखा या एकाच दिवशी किंवा सलग एका पाठोपाठ लागून आल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत.
त्यात पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना सलग एका पाठोपाठ ग्राउंड आल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ग्राउंड ला जाण्यासाठी शक्य होणार नाही. भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडे त्यांची महत्त्वाची ओरिजनल कागदपत्र असल्यामुळे ते पावसामुळे भिजले तर त्यांना त्या भरतीसाठी उतरता येणार नाही.
भरतीसाठी आलेले विद्यार्थी दूर दूर वरून भरती साठी आलेले असतात. त्यांची ना राहण्याची सोय असते ना कसली सोय असते. आणि पाऊस नसेल तर मूल कुठेतरी ब्रीज खाली, रोडवर ग्राउंड वर झोपतात आणि जर पाऊस असेल तर ते मुल कुठ झोपतील ? मुलांचे किती हाल होतील ?
वर्षानुवर्षे भरतीची तयारी करायची पण ऐन भरतीच्या वेळेसच सरकारकडून अशाप्रकारचा सावळा गोंधळ निर्माण केल्याने विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागतोय, तरी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता पोलीस भरती व SRPF भरतीच्या तारखा बदलाव्यात ही, विनंती!
या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री साहेब व राज्याचे गृहमंत्री साहेब यांना मेल द्वारे निवेदन दिले आहे.https://x.com/Nilesh_LankeMLA/status/1802239825228992852

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles