नगर : नगरचे खा.निलेश लंके यांच्या साधेपणाचा आणि सामान्यांमध्ये मिसळण्याचा प्रत्यय पुन्हा एकदा मतदारसंघातील जनतेला आला. खा.निलेश लंके यांनी नेहमीच्या चार चाकीचा वापर न करता कल्याण- पाथर्डी या एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करीत सामान्यांशी संवाद साधला. एरव्ही एसटीच्या गाड्यात आमदार, खासदारांसाठी सीट राखीव असले तरी कोणीही एसटीने प्रवास करीत नाही. खा.लंके यांनी मात्र बडेजाव न मिरवता एसटीने प्रवास करीत प्रवाशांशी संवाद साधला. स्वत: खासदार आपल्याबरोबर एसटीने प्रवास करीत असल्याचे पाहून प्रवाशीही आनंदीत झाले. कोणी त्यांना आपल्या समस्या सांगितल्या तर कोणी सेल्फी घेतली. खा.लंके यांनी चालक, वाहकाचीही आवर्जून विचारपूस केली.
https://x.com/INilesh_Lanke/status/1814514796886155644
खा.निलेश लंके यांचा एस.टी.बसमधून प्रवास, सामान्य जनतेशी साधला संवाद…व्हिडिओ
- Advertisement -