मराठा समाजाबद्दल नेते रामदास कदम यांनी जे काही वक्तव्य केले असेल तर त्याकडे लक्ष देऊ नये. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शब्द दिला आहे. न्यायप्रक्रियेसाठी सरकार सर्वतोपरी काम करत आहे. मुख्यमंत्री शिंदे मराठा समाजाला आरक्षण देणार आहेत. त्यामुळे इतर वक्तव्यांकडे लक्ष न देता कुठेही गैरसमज पसरू नये अशी शिंदे साहेब यांची भूमिका आहे. त्यामुळे रामदास कदम यांच्या वक्तव्याकडे लक्ष देऊ नये. आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत. ते मुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर मराठा समाजाने विश्वास ठेवावा. त्यांचेच वक्तव्य ग्राह्य धरावे. मुख्यमंत्री निश्चित स्वरूपाय मराठा समाजाला न्याय देतील असेही खासदार राहुल शेवाळे म्हणाले.