निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्रातील शेतकर्यांना मिळाले. घाटमाथ्यावरील 115 टीएमसी पाणी पुर्वेकडे आणण्यासाठी तसेच शिर्डीत आयटी पार्क व एम्स हॉस्पिटल आणि स्मार्ट सिटी आदी प्रकल्पांबरोबरच जिल्हा विभाजनाची मागणी खा. सदाशिव लोखंडे यांनी केली आहे. याबाबत पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचेही आपण लक्ष वेधणार असल्याचे खा. लोखंडे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 रोजी शिर्डी दौर्यावर असून जिल्हा विभाजनाच्या प्रश्नावर आपण पंतप्रधानांसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना साकडे घालणार आहे. शिर्डीत शेती महामंडळाच्या जागेवर आयटी पार्क निर्माण केल्यास लाखो तरुणांना रोज़गार उपलब्ध होईल. त्यासंबंधी तसेच शिर्डीत एम्स हॉस्पिटल निर्माण बाबतचे निवेदन पंतप्रधान मोदींना देणार असल्याचेही खा.लोखंडे यांनी सांगितले.