Monday, March 4, 2024

३० ते ३५ टक्के मतदारसंघांतील ‘ईव्हीएम’चे हॅकिंग केले जाते…भाजपवर गंभीर आरोप

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएम च्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, २०२४ च्याही निवडणुका ‘ईव्हीएम’वर घेतल्या गेल्या तर मोदी ४०० पेक्षा जास्त जागा जिंकून दाखवतील, असे सॅम पित्रोदांसारखे तज्ञ सांगत आहेत. भाजपास मध्य प्रदेशात १६३ जागा मिळणे शक्यच नव्हते. हा चमत्कार ‘ईव्हीएम’मुळे झाला हे आता सगळेच सांगतात. हे सर्व अगदी सहज घडवले जाते. लोकसभा आणि विधानसभेतील ३० ते ३५ टक्के मतदारसंघांतील ‘ईव्हीएम’चे हॅकिंग केले जाते. ईव्हीएम सोर्स कोडचे स्वतंत्र ऑडिटिंग झाले तर मशीनचा घोटाळा उघड होईल. ईव्हीएम हॅकिंग करून भाजप गेली काही वर्षे जिंकत आहे. त्यांना जिंकण्याची व मोदी यांच्या चमत्काराची, दैवी शक्तीची इतकी खात्री असेल तर मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायला हव्यात. भाजपा त्या कधीच घेणार नाही”, अशीही टीका संजय राऊतांनी केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles