Saturday, January 18, 2025

लाडकी बहिण योजनेमुळे आर्थिक बोजा…सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत पगार, बोनस नाही?

लाडकी बहीण योजनेमुळे होमगार्ड आणि सेक्युरीटींना पगार मिळतील की नाही याची शंका आहे. योजनेकडे सर्व पैसा वळवला आहे. या योजनेचं श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे. फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव वगळलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्री हा शब्द वगळला आहे. माझ्याकडे पत्र आहे. भाजपनेच ही योजना कशी आणली, आम्हीच कशी आणली हे दाखवण्याचं श्रेय फडणवीस यांनी करत आहे, असा आरोप आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील तिजोरीवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस सोडा सणासुदीत पगार तरी मिळेल की नाही, याची खात्री नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

मध्यप्रदेश, गोवा राजस्थान अशा ठिकाणी या लाडक्या बहिणींच्या योजना सुरू होत्या त्या योजना महाराष्ट्र मध्ये आणून फक्त निवडणुकीसाठी त्याचा वापर करण्यात येत आहे. तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणताही हप्ता जाणार नाही निवडणुकीसाठी केलेला फंडा आहे असे मी म्हणत नसून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणतात, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

Related Articles

1 COMMENT

  1. अरे मुर्खा मागील 26 वर्षापासून राज्य शासन कर्मचाऱ्यांना बोनस देत नाही हे तुला माहिती नाही का? लाडकी बहिण योजना आत्ता चालू झालीय.

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles