Monday, April 22, 2024

‘ईडी’मुळे अजित पवारांनी गुडघे टेकले पण रोहित पवार झुकले नाहीत…

ईडीकडून आमदार रोहित पवार यांच्यावर जी कारवाई सुरू आहे, तशी अजित पवार यांच्यावर देखील झाली. परंतु त्यांनी गुडघे टेकले आणि ते भाजपमध्ये पळून गेले. प्रफुल पटेल यांची प्रॉपर्टी जप्त केली. इकबाल मिरची यांच्याशी संबंध असल्याचे पुरावे ईडीने त्यांना दाखवले. त्यानंतर ते ही भाजपमध्ये गेले. मग त्यांचावरील कारवाई थांबली. पुढे हसन मुश्रीफ यांच्यावर अन् त्यानंतर अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळावरील कारवाई थांबली. पण अनिल देशमुख, रोहित पवार आणि मी तसेच अन्य काही लोक आहेत झुकले नाही. कोणापुढे नतमस्तक झालो नाही. त्यांच्या पायाशी बसायला तयार झालो नाहीत. कारण आम्ही स्वाभिमानी मराठी आहोत, असा टोला शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. रोहित पवार यांच्यावर सातत्याने तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. त्यांचा छळ केला जात आहे. त्यांच्या कुटुंबियांचा छळ केला जात आहे. त्यांना वारंवार तपासासाठी बोलावलं जात आहे. रोहित पवार यांनी असा काय गुन्हा केला आहे? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles