ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा आझाद मैदानावर आज दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या आधी ठाकरे गटाने शिंदे गटावर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली आहे. रावण हा अहंकारी होता आणि त्याचा नाश अहंकारानेच झाला. आज दसरा मेळावा त्या रावणाचा आज अहंकाराचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. 2024 च्या दसरा मेळाव्यावेळी दिल्लीत आणि महाराष्ट्रात शिवसेनेचे राज्यकर्ते बसले असतील. पुढच्या वर्षी शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
- Advertisement -