मुंबई : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डी येथील प्रसादालयात साईबाबा संस्थानतर्फे भाविकांना देण्यात येणाऱ्या जेवणाबाबत केलेलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे. सुजय विखे पाटील यांच्यावर टीका होत असल्याचं दिसत आहे. मोफत जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारीही येथे जमा झाल्याचं सुजय विखे पाटील म्हणाले होते. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जहरी टीका केली आहे.
भाजपकडे गेलेले सगळे भिकारी आहेत, हे द्या ते द्या, भ्रष्टाचारावरील कारवाईपासून वाचवा. हे सगळे भिकारीच आहेत. त्यांच काय ते बघा, मग शिर्डीतील भिकाऱ्यांबद्दल बोला. त्यांना रोजगार द्या याचा अर्थ महाराष्ट्र मध्ये काम चालत नाही. भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि सत्तेसाठी भाजपच्या दरवाजात भीक मागत असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी विखेंवर निशाणा साधलाय.