लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यावरून अहमदनगर दक्षिणचे खासदार आणि उमेदवार सुजय विखे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, महाविकासाने 2029 ची तयारी करावी.
यावर बोलताना विखे म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठलाही ताळमेळ राहिलेले नाही. प्रत्येक जण आपापल्या दिशेने पळत आहे. कुणाला उमेदवार ठरवतात आणि ते उमेदवारही पळून जात आहेत. त्यामुळे त्या भीतीने उमेदवारीही जाहीर होत नाही. त्यामुळे महाविकासाने 2029 ची तयारी करावी अशी टीका खासदार सुजय विखे यांनी केली.