एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या माझा महाकट्टा या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांना लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्या म्हणाल्या की माझं लग्न जुळवण्यात बाबांचा झिरो रोल होता. माझी आई आणि बाळासाहेब ठाकरे यांचा रोल अधिक होता, असं त्या म्हणाल्या. शरद पवार म्हणाले, की प्रॅक्टिकली माझी भूमिका शून्य होती. माझ्या जवळच्या मित्रांनी सदानंद सुळे यांचं स्थळ सजेस्ट केलं होतं. बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्योजक माधव आपटे असतील. माझ्या जावयाचे वडील (म्हणजे शरद पवार यांचे व्याही) आणि आपटे कदाचित मित्र होते. आमच्या मित्रांनी सजेशन दिलं, मग सुप्रिया आणि सदानंद हे दोघं भेटले. जवळचे लोक सुचवतील तो जावई, असं माझं ठरलेलं, असं शरद पवार म्हणाले.