Sunday, July 14, 2024

खा. सुप्रिया सुळेंनी केलं राज ठाकरेंचे कौतुक…

राज्यातील राजकारणातले वातावरण रोज गढूळ होत चाललं आहे, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर वेगळी चूल मांडली. पण, शिवसेनेवर हक्क सांगितला नाही. म्हणून राज ठाकरे यांचं कौतुक करते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. दौंडमध्ये प्रसामध्यमांशी बोलत होत्या.

खा. सुळे म्हणाल्या, “राज ठाकरेंनी शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर वेगळा पक्ष स्थापन केला. पण, राज ठाकरे यांनी शिवसेनेवर हक्क सांगितला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांचं कौतुक करते.”

“या कटकारस्थानामागे दिल्लीतून अदृष्य हात आहेत. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचा अपमान करण्याचं पाप सतत केला जात आहे. दोघांचं यश भाजपाला सहन होत नाही. म्हणून मराठी माणसांचा अपमान भाजपा करत आहे,” असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles