राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक मोठं वक्तव्य केलं. “राज्यात भाजपाच बॉस असला पाहिजे”, असं सूचक वक्तव्य फडणवीसांनी केलं. त्यापाठोपाठ ट्रिपल इंजिन सरकारमधील अजित पवारांचा गट नाराज असून देवेंद्र फडणवीसांना भेटल्याची चर्चा सुरू झाली आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, यांचं ट्रिपल इंजिन सरकार बनून केवळ तीनच महिने झाले आहेत, आणि आज सकाळीच एक बातमी आली आहे की, यांच्यात एक गट नाराज आहे. ट्रिपल इंजिन सरकारमधील एक गट नाराज असून हा गट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटला आहे. कारण त्यांची नाराजी आहे. ही बातमी खरी-खोटी माहिती नाही. परंतु, तुमच्या सरकारला आत्ता फक्त तीनच महिने झाले आहेत. तुमचा हनीमूनही अजून संपला नाही आणि तुमची नाराजी कशी काय सुरू झाली? तीन महिन्यांच्या आतच यांच्यात या सगळ्या गोष्टी सुरू व्हायला लागल्या आहेत. याचा अर्थ सरकार चालवतंय कोण?