राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्त्व सुप्रिया सुळेंकडे जाणार असल्याने अजित पवारांनी बंड केल्याची चर्चा आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “या मुद्द्यावर मी अजित पवार किंवा त्यांच्या समर्थकांशी खुली चर्चा करायला तयार आहे. पक्षात पक्षाच्या उत्तराधिकारी पदावरून कोणताही वाद नव्हता. पण अजित पवारांनी जे केलं ते चुकीचं होतं.”
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये त्या बोलत होत्या.
अजित पवारांना नेतृत्त्व द्यायला आम्ही तयार होतो. मी कधीच नेतृत्व मागितलं नाही. ते त्यांनाच मिळणार होतं. त्यांनी मागितलं असतं तर देऊन टाकलं असतं. पक्ष घ्यायची गरज नव्हती, मागितलं असतं तर दिलंही असतं. यात कोणती मोठी डील आहे? आमचं आयुष्य विस्कळीत करून ते गेले. त्यांच्याकडे हा पक्ष ठेवण्याचा पर्याय होता”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पक्ष फोडणे, चिन्ह चोरणे म्हणजे राजकारण नाहीय. देश असा नाही चालत. देश संविधानाने चालतो.”