पुणे: भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना केली होती.
या टीकेला आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
शरद पवार यांच्यावर टीका करत नाही, तोपर्यंत हेडलाईन होत नाही, हे अमित शाह यांना माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. “आज भाजपाचे लोक ज्याला एनडीए सरकार म्हणतात, ते काही महिन्यांपूर्वी मोदी सरकार होतं. याच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. अमित शाह हे त्याच सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, हे सर्व ते विसरले असतील, त्यामुळे त्यांनी टीका केली”, असं प्रत्युत्तरही सुप्रिया सुळे यांनी दिलं.