नगर जिल्ह्याचा विकास करणं हेच माझं ध्येय आहे. माझ्या कुटुंबाने देखील पन्नास वर्षे जे जपलं तेच पुढे घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतील माझे भवितव्य कोणी ठरवू शकत नाही. पुढील खासदार हा जिल्ह्यातील जनताच ठरवेल”, असं खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.
तसेच आगामी लोकसभा निवडणुकीबाबत माझा प्रतिस्पर्धी कोण आहे? कोण उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहे? याचा मी कधीही विचार केलेला नाही. कारण खासदारकीवर आमचा प्रपंच नाही, मी अनसिक्युअर्ड नाही”, असंही ते म्हणाले. खासदार विखे पाटील सुपा येथे एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
लोकसभेला प्रतिस्पर्धी कोण असेल याचा विचार करीत नाही…खा.विखेंच वक्तव्य
- Advertisement -