मराठा समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांना जो त्रास फडणवीस आणि सरकारने दिला. त्या त्रासाचा बदला समाजाने लोकसभा निवडणुकीत घेतला. त्याचमुळे मी खासदार झालो, असे वक्तव्य खासदार आणि काँग्रेस काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांनी केले. ते मिरजेमध्ये एका सत्कार समारंभात बोलत होते.
तसेच पुढील विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात चार ते पाच काँग्रेसचे आमदार निवडून येतील. असा दावा विशाल पाटील केला आहे. तसेच वसंतदांताच्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा आणि विश्वजीत कदम हेच मुख्यमंत्री होणार असेही विशाल पाटील यांनी बोलून दाखवलं.राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलाय. मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत ओबीसी नेत्यांना पराभूत करण्यासाठी बैठका घेतल्याचा आरोप ओबीसी नेत्यांकडून केला जात आहे.
त्याचदरम्यान विशाल पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे मराठा ओबीसी वाद अजून विकोपाला जाणार असल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फटका भाजपला बसल्याचं दिसलं. बीडमध्ये पंकजा मुडें यांचा पराभवही त्याच कारणामुळे झाला. निवडणुकीच्या अखेरच्या दिवसांमध्ये मराठा-वंजारा असा वाद सुरू झाला होता. त्याचा परिणाम पंकजा मुंडेंना बसला होता.