मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे. तसेच मध्य प्रदेशमध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत सर्व जागा जिंकल्या. मात्र, तरीही राज्यात चांगला रस्ता नसल्याची तक्रार करत महिलेने थेट पंतप्रधान मोदींना लक्ष देण्याची विनंती केली आहे. या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधून महिला पंतप्रधान मोदी यांच्याकडे रस्ता बांधण्याची विनंती करत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सांगूनही त्यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचंही महिलेने म्हटलं.
व्हायरल व्हिडिओमध्ये महिला म्हणत आहे की, ‘मोदीजी, आमच्या येथे रस्ता बांधून द्यावा. आमच्या राज्यात भाजपचे २९ पैकी २९ खासदार जिंकले आहेत. त्यामुळे कमीत कमी चांगला रस्ता तरी बांधा. रस्ता बांधण्याच्या मागणीसाठी लोकांनी खासदार, आमदार, जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिली. मात्र, त्यांची तक्रार कोणीच ऐकून घेतली नाही’.महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हटलं की, ‘सीधी जिल्ह्यातील खड्डीखुर्द हे माझ्या गावाचं नाव आहे. आमच्या गावाजवळ जंगल असलं तरी काय झालं? आम्हाला चांगला रस्ता हवाय. या ठिकाणी अनेक बसचा उलटून अपघात होतो. पावसात या ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण होते. माझी विनंती पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे’.
https://x.com/anuraag_niebpl/status/1808824906806673615?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1808824906806673615%7Ctwgr%5Eb2684d3e12e2643b592c11565e9ed106cb0dc025%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fviral-videos%2Fmadhya-pradesh-sidhi-woman-video-viral-on-social-media-for-demands-to-construct-road-in-village-to-pm-narendra-modi-vvg94
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका युजर्सने म्हटलं की, ‘मागील १५ वर्षांपासून मध्य प्रदेशचा किती विकास झाला? हे सत्य या महिलेने उघडकीस आणलं आहे’.