महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा २०२४ साठी नोंदणी प्रक्रिया सुरु करणार आहे. यामध्ये राज्य सेवेतील गट-अ आणि ब मधील २०५ पदांसाठी नोंदणी प्रक्रिया केली आहे.
सरकारी खात्यात नोकरी करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पदभरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याविषयीची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा २०२४ साठी नोंदणी प्रक्रिया सुरु करणार आहे. यामध्ये राज्य सेवेतील गट-अ आणि ब मधील २०५ पदांसाठी नोंदणी प्रक्रिया केली आहे. ५ जानेवारी २०२४ पासून अर्ज करता येईल. तसेच यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये २६ पदे तर महाराष्ट्र वन विभागात ४३ पदांसाठी रिक्त जागा आहेत.इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकता. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२४ पर्यंत आहेत. ऑनलाइन अर्ज कसा कराल, जाणून घेऊया सविस्तर
1. रिक्त जागा – २७४
राज्य सेवा गट अ व गट ब : २०५ जागा
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ आणि ब : २६ जागा
महाराष्ट्र वन सेवा, गट अ आणि ब : ४३ जागा
2. अर्ज शुल्क किती?
मागासवर्गीय/अनाथ/ दिव्यांगांसाठी ३४४ रुपये
तर इतरांसाठी ५४४ रुपये अर्ज फी असेल.
3.उमेदवरांने कोणत्याही शाखेतून ५५ टक्के गुणांसह बी. कॉम + सीए, आयसीडब्ल्युए + एमबीए अथवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवशयक आहे.
4. वयोमर्यादा किती?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ३८ वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय/अनाथ/ दिव्यांगांसाठी ५ वर्षांची सूट मिळेल.
५ जानेवारी २०२४ पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होईल.
ऑनलाइन पद्धतीने अर्जाची शेवटची तारीख ही २५ जानेवारी २०२४ असणार आहे.
भारतीय स्टेट बँकेत (SBI) चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्हाला २८ जानेवारी पर्यंत भरता येईल.
तर ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिवस हा २९ जानेवारी २०२४ बँकेच्या वेळेमध्ये असणार आहे.