बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट गावच्या संतोष खाडेच्या यशाची जोरदार चर्चा आहे. ऊसतोड कामगाराच्या मुलाने एमपीएससीच्या निकालात एनटी-डी प्रवर्गातून पहिला क्रमांक मिळवलाय. याच अधिकारी संतोष खाडे यांचा वडिलांसोबतचा व्हिडीओ व्हायरल जोरदार व्हायरल होत आहे.
संतोषचे आई-वडील गेल्या ३० वर्षांपासून ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जातात. संतोषला बालपणी एकतरी आज्जीसोबत किंवा ऊसाच्या फडात रहावं लागलं. याच संघर्षातून कष्ट करत त्याने हे यश मिळवलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता संतोषने रिझल्ट लागल्यानंतर आनंदात त्याच्या वडिलांना खांद्यावर उचलून घेतलं आहे. हा व्हिडीओ संतोषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.