अहमदनगर – देशातील पाच राज्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही आज निकालाच्या दिवशी आघाडीवर असून या विजयाचा जल्लोष भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे यांनी साजरा केला फटाक्याच्या आतिषबाजीत अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप व कार्यकर्त्यांना पेढे भरून वाजत गाजत हा आनंद जल्लोषात साजरा करण्यात आला
यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे जे पाच पाच राज्यांमधील निवडणुकीचे निकाल समोर येत आहे त्यापेक्षाही चांगली कामगिरी महाराष्ट्रात महायुती सरकार करून दाखवेल जिथे आमचं सिंगल इंजन सरकार होतं तिथं ही परिस्थिती आहे तर जिथे डबल इंजन आहे तिथं काय होणार याचा अंदाज कोणी लावू शकत नाही
पाच राज्यातील विजय हे उत्तर आहे ते अहंकारी माणसाला जे रोज टीव्ही समोर येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्रातील महायुती सरकारवर आरोप करत होते आणि त्यामुळे 2024 मध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त जागा इंडियाला मिळून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विराजमान होतील असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला
तर अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील भारतीय जनता पार्टीच्या या विजयाच्या पार्श्वभूमीवर ढोल ताशांच्या गजरात नाचत आनंद व्यक्त केला तर भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांना पेढे भरवून महाराष्ट्राच्या महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे सामील झाल्यानंतर एक नवचैतन्य निर्माण झाला असून येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रात देखील महायुतीत राष्ट्रवादी पक्ष हा भक्कमपणे निवडून सत्तेत काम करताना दिसेल अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली आहे
भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या जल्लोषात भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप तसेच भारतीय जनता पार्टी व अजित पवार गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते