नगर : खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रभू श्रीराम जेव्हा 14 वर्षाचा वनवास भोगून आयोध्येत आले होते त्यावेळेस लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी साजरी केली होती आता तर 500 वर्षाचा वनवास भोगून श्रीराम पुन्हा अयोध्येत येत आहे त्यामुळे 22 तारखेला सर्वांनी दिवाळी साजरी करावी प्रत्येकाने आपल्या घरी लाडू तयार करावे व त्यातील दोन लाडू हे आपल्या परिसरातील श्रीराम मंदिरामध्ये प्रसाद म्हणून ठेवावे या सर्व लाडूला एकत्र करून आपल्या परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून वाटावे असे आव्हान त्यांनी केले तसेच प्रत्येकाच्या घरी लाडू झाले की नाही याची यादी तयार करण्यात येणार आहे आणि ती यादी घेऊन मी व आमदार संग्राम भैय्या जगताप आम्ही दोघे आयोध्या मध्ये जाऊन ती यादी प्रभू श्रीरामांच्या चरणी ठेवणार असल्याचे त्यांनी मिश्किल पणे सांगितले यावेळी आपल्या शैलीमध्ये त्यांनी भाषण करून उपस्थितांची मने जिंकली
प्रभाग क्रमांक एक मधील भिस्तबाग चौक इथे नागरिकांना साखर व डाळ वाटप करण्यात आली, यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी नगरसेविका दीपाली बारस्कर, मीनाताई चव्हाण, शारदा ढवण, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, निखिल वारे, बाळासाहेब बारस्कर, अनिल ढवण, नितीन शेलार, सचिन पारखी आदी उपस्थित होते.
माजी नगरसेविका शारदा ढवण म्हणाल्या की, प्रभागाच्या विकासासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोठ्या निधी मंजूर केला असून आता टप्प्याटप्प्याने ती विकासाची कामे पूर्ण होणार आहे.
ठरलं…. खा.सुजय विखे पाटील आमदार संग्राम जगताप जाणार अयोध्याला !
- Advertisement -