अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. परंतु सध्या ती वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.
मृण्मयी सध्या मुंबई सोडून महाबळेश्वरमध्ये तिच्या नवऱ्याबरोबर राहते. या जोडप्याने निसर्गाच्या सानिध्यात महाबळेश्वरमध्ये सुंदर असं घर बांधलं आहे. याच ठिकाणी दोघांनी ‘नील अँड मोमो फार्म’ नावाचा व्यवसाय सुरू केला आहे. दोघेही शेतात एकत्र काम करून नैसर्गिक उत्पादनांच्या निर्मितीवर भर देत आहेत. २०२० पासून मृण्मयी मुंबई सोडून महाबळेश्वरला स्थायिक झाली. त्यांच्या शेतातील सुंदर फोटो व व्हिडीओ अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर करत असते. याठिकाणी शेतीबरोबरच ते दोघे नैसर्गिक साबणांची निर्मिती सुद्धा करतात.