Thursday, January 23, 2025

‘या’ दिवशी लाडकी बहिण योजनेचे डिसेंबरचे पैसे खात्यात जमा होणार!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या १५०० रुपयांचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? यासंदर्भातील महत्वाची माहिती समोर आली आहे. भाजपाचे नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसांत मिळणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

आता सरकार स्थापन झालेलं आहे, सरकार अतिशय चांगलं काम करत आहे. आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होईल. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर लगेचच मंत्रिमंडळाची बैठक होईल. काहीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. सर्व विभाग त्यांचं काम करत आहेत. चांगले निर्णय होत आहेत. आता लाडक्या बहि‍णींचा हप्ता देखील पुढील दोन ते तीन दिवसांत मिळणार आहे. कुठेही काहीही अडचण नाही”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles