उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना अजून एक मोठी खुशखबर दिली आहे. लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्यांचे पैसे खात्यावर जमा होणार असून नोव्हेंबर महिन्यांचे पैसे देखील ऑक्टोबरमध्येच म्हणजे दिवाळीलाच जमा होणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आधी दोन महिन्यांचे तीन हजार दिले. त्यानंतर आता लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पैसे दिले आहेत. मात्र, आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे लाडकी बहीण योजनेचे पैसे १० ऑक्टोबरच्या आधी दिवाळी भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो”, असं अजित पवार यांनी एका सभेत बोलताना म्हटलं आहे.