मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत आता लवकरच महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहे. मात्र, त्याआधीच ६० लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. याबाबत शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी मोठ वक्तव्य केलं आहे.छगन भुजबळ यांनी अपात्र लाडक्या बहिणींना स्वतः हून नावे काढायला सांगितले होते. जर त्यांनी स्वतः हून या योजनेतून नावे काढली नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांवर कारवाई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान या चर्चा सुरु असतानाच ६० लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.
अपात्र महिलांचे अर्ज बाद होणार आहे. ६० लाख महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.पहिल्या टप्प्यात ६० लाख महिला या योजनेपासून वंचित होणार आहे. त्यांचे पैसे परत घेतले जाणार आहेत, असं विनायक राऊत यांनी सांगितले आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे. या तपासणीत महिला पात्र नसतील तर त्यांना या योजनेतून अपात्र केले जाणार आहेत. त्यामुळे ज्या महिला पात्र नाहीत तरीही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांना पैसे परत करावे लागणार असल्याचे म्हटले आहे.