सध्या राज्य सरकारने अमलात आणलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. गेल्या महिन्यात रक्षाबंधनाच्या आधी बहिणीला ओवाळणी म्हणून अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपयांची रक्कम जमा झाली. त्यामुळे अनेक महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हिडीओत सासू-सून जबरदस्त ठेका धरताना दिसतायत. “सूनबाईचे ३,००० रुपये आले” असं या व्हिडीओवर लिहिलं आहे. तर हा व्हिडीओ @nakti_family0803 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “सूनबाई चल पार्टी करू” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
- Advertisement -