Sunday, September 15, 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना… नगर जिल्हा परिषदेत 932 जणांना मिळणार संधी…

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षा यांच्यामार्फत मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या मंजूर पदाच्या पाच टक्के, तसेच सहा ते आठ किंवा त्याहून अधिक पट संख्या मंजूर असणार्‍या मोठ्या शाळांमध्ये संगणक डाटा एन्ट्री ऑपेरटरची कामे करण्यासाठी प्रशिक्षित प्रशिक्षणार्थी सेवक यांची नेमणूक करण्यात येणार आहे. नेमणूक करण्यात येणार्‍या प्रशिक्षित प्रशिक्षणार्थी सेवक यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतानूसार किमान सहा हजार तर जास्तीजास्त दहा हजारांचे मानधन (विद्या वेतन) देण्यात येणार आहे. यासाठी बारावी, पद्वी, पद्विका आणि संगणकाचा एमएससीआयटी अशी शैक्षणिक अर्हता शिक्षण असणार्‍यांना आणि जिल्हा स्वयंरोजगार विभाग यांच्याकडे नोंदणी असणार्‍यांची निवड करण्यात येणार आहे.

दरम्यान, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने स्वयंरोजगार विभागाकडे असणार्‍या नोंदणीकृत शैक्षणिक अर्हता असणार्‍यांची यादी मागवली असून येत्या 10 दिवसात ही यादी जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्यानंतर प्रशिक्षित प्रशिक्षणार्थी सेवक पदासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्या मार्फत ही राबवण्यात येणार आहे. यामुळे नगर जिल्ह्यात प्राथमिक शाळांमध्ये 932 जागा मानधन अथवा विद्यावेतन तत्वावर भरण्यात येणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles