Monday, December 4, 2023

कोणीही आमच्या परिवारावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करू शकला नाही….

मुळा-प्रवरात एक चांगला काळ काढला, खेळीमेळीत गेला. आता एक सहकारी कारखाना इकडे गेला तर तिकडे आरोप सुरू झाले. आरोप आमच्या पाचवीला पुजलेले आहे. आरोप कितीही केले तरी एकही माईचा लाल आमच्या परिवारावर केलेला भ्रष्टाचाराचे आरोप आजपर्यंत सिध्द करु शकला नाही. त्यामुळे कोणी पाच कोटी, कोणी दोन कोटी खाल्ले यावर लोक हसतील. त्यामुळे योग्य वेळ आली की उत्तर देईल, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

मुळा-प्रवरा वीज सोसायटीची वार्षिक सभा येथील मातोश्री सांस्कृतिक भवनात संस्थेचे प्रशासक तथा राहाता येथील सहकारी संस्था सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली.
मुळा- प्रवरा वीज संस्थेसाठी आपले प्रयत्न चालू असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची मुळा-प्रवरा संस्थेबाबत सकारात्मक भूमिका राहिली आहे. त्यामुळे ही संस्था पुन्हा कशी उभारेल यासाठी प्रयत्न करीत आहोत. राजकारण व सहकार हे दोन वेगवेगळे पैलू असले पाहिजे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: