मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री शिंदे गटाचा ‘दसरा मेळावा’ पार पडला. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “२६ जुलै २००५ च्या महापुरात वांद्रे परिसरात सगळीकडे पाणी भरलं होतं. तेव्हा तुम्ही (उद्धव ठाकरे) बाळासाहेबांना एकट्याला सोडून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायला गेलात. बाळासाहेबांना तुम्ही पाण्यात ‘मातोश्री’वर सोडलं. जे बाळासाहेबांचे होऊ शकत नाहीत, ते तुमचे-आमचे काय होणार? हा विचार करण्याची आवश्यकता आहे. एकदा का त्यांनी एखाद्याचा काटा काढायचं ठरवलं, तर ते बरोबर काटा काढतात. याची उदाहरणं मी याठिकाणी देऊ इच्छित नाहीत.”