Monday, April 22, 2024

मनोज जरांगे यांना मिळणार जोरदार प्रत्युत्तर…भाजप आमदारांना स्पष्ट निर्देश

मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्याविरोधात मवाळ भूमिका न घेता पोलीस व सरकारने आक्रमक होऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केली. राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले असून तरीही जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर खोटे आरोप करीत आंदोलन सुरू ठेवल्याने त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या सूचना भाजपने आमदारांना दिल्या आहेत.

जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर भाजपमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानभवनात भाजप आमदारांच्या झालेल्या बैठकीतही याबाबत चर्चा झाली. जरांगे यांना पवार यांची फूस असल्याचे आरोप अनेक भाजप नेत्यांनी केले. जालना जिल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांचाही जरांगे यांना पाठिंबा असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. जरांगे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई न केल्यास आपण कोणाही विरोधात काहीही बोलले, तरी चालते, हा संदेश जाईल, असा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles