मुंबईमध्ये २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील घटक पक्षांची वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टीकास्र सोडले. अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, मी दिल्लीत शिक्षण, आरोग्य क्षेत्रात गरीबांना न्याय देणारे काम केले, म्हणून तुरुंगात टाकले. मी दिल्लीतील लोकांना मोफत औषधे दिली. पण जेव्हा मी तिहार तुरुंगात होतो, तेव्हा मला इन्सुलिन मिळू दिले नाही. माझी साखरेची पातळी प्रचंड वाढली. माझ्याबरोबर त्यांना काय करायचे होते? याची मला कल्पना नाही. पण इतिहासात अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकून त्यांना शारीरिक इजा पोहोचवण्यात आल्या होत्या.
पंतप्रधान मोदी एका गूप्त मोहिमेवर काम करत आहेत, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. “एक देश, एक नेता”, ही मोहीम त्यांनी सुरू केली आहे. त्याअंतर्गत त्यांनी देवेंद्र फडणवीस, शिवराज सिंह चौहान अशा मोठ्या प्रादेशिक नेत्यांचे राजकीय नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकसभा निवडणूक संपन्न होताच आता पुढचा नंबर योगी आदित्यनाथ यांचा आहे. विरोधकांना संपवितानाच मोदी यांनी स्वपक्षातील मोठ्या नेत्यांनाही संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.
मोदींची गुप्त मोहीम… देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण संपवले आता पुढचा नंबर
- Advertisement -