Monday, April 22, 2024

मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानावरुन सकाळीच पत्रकार परिषद घेतली. राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल यावेळी सरकारला सादर करण्यात आला. शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

मराठा समाजाचं आर्थिक, सामाजिक मागासलेपणं तपासण्यासाठी साडेतीन ते चार लाख जण दिवसरात्र, युद्ध पातळीवर जलदगतीने काम करत होते. सव्वादोन कोटींहून अधिक कुटुंबांचं सर्वेक्षण यात करण्यात आलं. मंत्रिमंडळात अहवालावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. २० तारखेला विशेष अधिवेशनात याबाबत चर्चा होईल. कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं, ओबीसी किंवा इतर समाजावर कुठलाही अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देता येईल, असा विश्वास मला वाटतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आणि सकारात्मक असल्याचं ते म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles