मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती सुरू असून महापालिका प्रशासनाने या भरतीसाठी जाचक अटी घातल्या आहेत. पालिका प्रशासनाने उमेदवारांकडून बारावी व पदवी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्रही मागितले आहे. हे प्रमाणपत्र जोडल्याशिवाय अर्जच स्वीकारला जात नसल्याने अनेकजण वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खरपूस टीका केली आहे.
अंजली दमानिया यांनी यासंदर्भातील दोन ट्विट केले आहेत. आधी त्या म्हणाल्या, “मुंबई महानगर पालिकेत क्लर्कच्या भरती साठी इतक्या भरमसाठ अटी कशासाठी? तुमच्या मुलांना मिळतात तशा सुखसोयी सगळ्या मुला / मुलींना मिळत नसतात. झगडावं लगत त्यांना शाळेत जाण्यासाठी, अभ्यासासाठी, नोकरीसाठी.” १० वी व पदवीची परीक्षा पहिल्या प्रयत्नात का हवी ? मी खाली काही उदाहरण दिली आहेत ती पाहा, अशी कित्येक उदाहरणे देऊ शकते जिथे शाळेत नापास झालेले, IAS झाले आहेत…..हे तर क्लर्क म्हणून भरती होणार आहेत. इंग्रजी व मराठी टाइपिंग आले पाहिजे? BMC मध्ये टाइपरायटर आहेत तरी का? आता सगळ्यांना कंप्यूटर टाइपिंग करावे लागते ना. प्रकल्पग्रस्त हा प्रकल्पग्रस्त असतो, मुंबई – ठाण्यातील वेगळा नसतो. त्यांना समान संधी देणे अपेक्षित आहे. एक तर ही ९ तारीख पुढे ढकला आणि त्यांच्या बरोबर चर्चा करून ह्या तीन अटी रद्द करा. भूषण गगरानी आणि अश्विनी जोशी ह्यांनी कृपया दाखल घ्यावी”, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री फक्त दहावी पास चालतात, पण क्लार्कच्या भरतीमध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण युवक हवेत?” असा सवाल त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला.https://x.com/anjali_damania/status/1831231536907100419