क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन झाले आहे. ते अमेरिकेत टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे.अमेरिकेत टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. रविवारी (९ जून) न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत- पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. हा सामना पाहण्यासाठी अमोल काळे देखील उपस्थित होते. त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत या सामन्याचा आनंद घेतला.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांसह त्यांची प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळख होती. नवीन तंत्रज्ञान, लोकांचा विकास, परदेशी व्यवसाय आणि भारतातील प्रवेश सेवांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केलं. यासह त्यांनी जगभरातील नावाजलेले नेते आणि स्टार्टअप यांच्याशी जवळचे संबंध प्रस्थापित केले होते.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
- Advertisement -