व्हिडिओमध्ये एक जोडप धावत्या स्कूटरवर रोमान्स करताना दिसतय. व्हिडिओमध्ये दिसतय मुलगा स्कूटर चालवतोय आणि मुलगी त्याच्या मांडीवर बसली आहे. दोघांच्या अंगावर एक शाल गुंडाळलेली आहे. दोघांनी वाहतुकीचे नियम सुद्धा मोडले. दोघांपैकी एकानेही हेल्मेट घातलेलं नाही. अशावेळी अपघात झाला, तर काय होईल? याचा विचार करा. कपलचा रस्त्यावरील हा रोमान्स एका प्रवाशाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कपलचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर पर @bandrabuzz नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आलाय. वांद्रे रेक्लेमेशनचा हा व्हिडिओ असून मुंबई पोलिसांनी रस्ते सुरक्षा सुनिश्चित करावी असं कॅप्शनमध्ये लिहिल आहे.https://x.com/bandrabuzz/status/1746162295728926870?s=20