Friday, June 14, 2024

लोकसभा निवडणूक… अजित पवार म्हणाले, यावेळेस ब्रम्हदेव जरी आला तरी सांगू शकणार नाही…

संघटना म्हणून आम्ही आमच्या स्तरावर काळजी घेणार आहोत. याबद्दल कोणीही तीळमात्र शंका बाळगू नका, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले. मुंबई येथे आयोजित पक्ष कार्यकारिणी बैठकीत अजित पवार बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मला आठवतंय जेव्हा आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे काम करायचो. त्यावेळी आम्हाला कधीकधी सांगितले जायचे की, शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या. शिवसेनेला ठोका. महाविकास आघाडीत असताना असा विचार असायचा. मी त्यांना विचारायचो का? ते म्हणायचे शिवसेनेला ठोकल्यानंतर अल्पसंख्यांकांना समाधान मिळते. त्यांना आनंद वाटतो. पण यावेळेस तर अल्पसंख्याक समाज शिवसेनेबरोबर जायला निघाला होता. त्यामुळे काय, कुठे, कसे गणित बदलते पाहा. यावेळेस ब्रम्हदेव जरी आला तरी सांगू शकणार नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles