‘मिलिअन्स एकर’ या बिल्डरने मारवाडी आणि गुजराती कुटुंबाना प्राधान्य अशी जाहिरात मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड पूर्व भागातील गृहप्रकल्पासाठी केली होती. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याविरुद्ध आवाज उठवला.संबंधित जाहिरात मागे घेत ‘मिलिअन्स एकर’तर्फे हर्षित राजपूत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना माफी मागणारं पत्र लिहिलं आहे.
“माजलेल्या “Millions Acre” ने राज ठाकरे यांची माफी मागितली आहे. घर फक्त मारवाडी आणि गुजराती समाजाला दिलं जाईल, अशी जाहिरात करणाऱ्या ह्या ‘मिलिअन्स एकर्स’ने मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे कॉल जाताच माघार घेतलीय. आपल्याकडे म्हटलं जातं “एक कॉल, मॅटर सॉल्व्ह”… अगदी असंच काहीसं मनसेचे मावळे सतत परप्रांतीय आक्रमणा विरोधात उभे राहतात.” अशी पोस्ट मनसे रिपोर्ट या ‘एक्स’ हँडलवरुन करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये बिल्डरची मूळ जाहिरात आणि बिल्डरचा माफीनामा सोबत जोडण्यात आला आहे.
एक कॉल, मॅटर सॉल्व्ह…बिल्डरकडून राज ठाकरेंचा माफीनामा…
- Advertisement -