लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मनसेला मुंबईत मोठा धक्का दिला आहे. मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्ते आज भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आज हा प्रवेश सोहळा पात पडणार आहे. मनसे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मर्गज यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मनसेला जय महाराष्ट्र करणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.
भाजपकडून एकीकडे युतीचा प्रस्ताव दिला जात असून, दुसरीकडे मनसेत दुसरीकडे फोडाफोडी केली जात आहे. कारण मुंबईत एकाचवेळी मनसेच्या 650 पदाधिकाऱ्यांनी भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, विधान परिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत आज संध्याकाळी जाहीर प्रवेश करत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.