Tuesday, March 18, 2025

त्यांनी ४०० जागांऐवजी संसदच ताब्यात घ्यावी… शिंदे गटातील बडा नेता भाजपवर बरसला…

मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. अमोल किर्तीकर यांच्यावर करोना काळात खिचडी वाटपात गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला अमोल किर्तीकर यांचे वडील विद्यमान खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात गेलेले आहेत. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत गजानन किर्तीकर यांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार करू, असे दोनच दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र काल गोरेगावमध्ये झालेल्या एका प्रचारसभेत त्यांनी मुलगा अमोल किर्तीकर यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा निषेध केला. तसेच पंतप्रधान मोदींवर शरसंधान साधले.

गजानन किर्तीकर प्रचारसभेत बोलताना म्हणाले, “शिवसेनेत मला ५७ वर्ष झाली. पण मी कधी लबाडी किंवा कपट-करस्थान मी कधीच केलं नाही. अमोल किर्तीकर विरोधात मी प्रचार करणार हे जाहीर केले होते, त्याप्रमाणे मी त्यांच्याविरोधात प्रचार करणार आहेच. पण अमोल किर्तीकर यांच्याविरोधात सुरू असलेल्या ईडी चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही. खिचडी घोटाळ्यातून काहीही हाती लागणार नाही, हे ईडीचे अधिकारीही खासगीत मान्य करतात.”

भाजपाने यंदा ‘४०० पार’ असा नारा दिला आहे. त्यांनी ४०० जागांऐवजी संसदच ताब्यात घ्यावी, पण दुसऱ्या बाजूला विरोधकांचाही सन्मान ठेवावा, अशा शब्दात गजानन किर्तीकर यांनी भाजपावर शरसंधान साधले. विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे, ही भाजपाने आणलेली नवी संस्कृती असल्याचेही किर्तीकर यावेळी म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles