खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
यावेळी नगर जिल्ह्यातील साकळाई योजनेचे सर्वेक्षण पूर्ण करून प्रशासकीय मान्यतेबाबत बैठक घेण्याची विनंती केली.
यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच बैठक घेऊन साकळाईचे पुढील नियोजन करण्याचे आश्वासन फडणवीस साहेबांनी दिले.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव कर्डिले उपस्थित होते.