विधानसभेसाठी अजित पवार गटाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सोमवारी बजट सत्रादरम्यान दादांच्या गटाने एक बैठक घेतली. त्यात निवडणुकीवर चर्चा झाली. त्यानंतर दादांच्या गोटाने विधानसभा निवडणुकीसाठी नरेश अरोरा यांची रणनीतीकार म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. नरेश आरोरा हे पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनी design boxed.com चे सह संस्थापक आहेत. त्यांनी यापूर्वी राजस्थान आणि कर्नाटकसह अनेक राज्यात काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन केले आहे. सोमवारी अजित पवार गटाने घेतलेल्या बैठकीत नरेश आरोरा यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पार्टीची ब्रँडिंग आणि रणनीतीविषयी सादरीकरण केले. अजित पवार यांना पक्षाचा नेता म्हणून ब्रँडिंग करण्याचे आणि मेकओव्हर वर काम करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यांची प्रशासनावरील पकड, शब्दांचे पक्के दादा, सर्व आश्वासनांची पूर्तता करणारे, दिलेला शब्द पाळणारे नेते, रोखठोक अजित पवार या दृष्टीने त्यांचे ब्रँडिंग करण्यात येणार आहे.