राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईतील बैठकीत काही कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी मागणी केली होती त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
या बैठकीत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, पक्ष चालवणं हे काही सोपं काम नाही, फक्त जोरदार भाषण करून उपयोग नसतो तर डोकं शांत ठेऊन आक्रमक कार्यकर्त्यांसह शांत कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचे काम करावे लागते. प्रत्येकाने पुढील दोन दिवसात विधानसभा निवडणुकीत आपल्या आपल्या वॉर्डात पक्षाला किती मत मिळवून दिली ते सांगा त्यानंतर आठ दिवसात राजीनामा देतो असं जयंत पाटील म्हणाले. तसेच मी एकटा कितीवेळा काम करायचं? आठ दिवसाचा वेळ द्या स्वत:हून प्रदेशाध्यक्षपद सोडतो. निडणुकीत बुथवर काम केल्याचा डेटा द्या. कुणी काय काम केलं याची सविस्तर माहिती द्या. त्यांतर पदावरून बाजूला होतो. बोलणं सोपं असतं पण चांगला माणूस मिळणं अवघड असतं. असेही यावेळी जयंत पाटील म्हणाले.