राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय आढावा बैठकीला बुधवारी सुरुवात झाली. महाविकास आघाडीच्या सकाळच्या सत्रात पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते. लोकसभेतलं घवघवीत यशामुळे आपण गाफील राहिलो. विधानसभा हातचा मळ असल्याचा समज केला. दुसरीकडे पराभवाची गांभीर्याने नोंद करत विरोधकांनी, संघाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती. घरोघरी गेले हिंदुत्वाचा प्रचार केला. दोन्ही बाजू मतदारांना सांगितल्या. त्याचा परिणाम निकालाच्या रूपात त्यांना मिळाल्याचे पवार म्हणाले.
1952 च्या निवडणुकीत काँग्रेसने 90% जागा जिंकल्या होत्या 1957 च्या निवडणुकांमध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसला अनेक जिल्ह्यात शून्य तर काही जिल्ह्यात एक दोन जागाच मिळाल्या, असेही पवार म्हणाले. आज पासून कामाला लागा आपल्याकडे संपूर्ण पाच वर्ष आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीत मोठी जोखीम घेणार आहे. महिलांना 50 टक्के तर खुल्या गटात 60 टक्के उमेदवारी तरुणांना दिली जाईल. प्रस्थापित घराण्यांमधील युवकांना प्राधान्य नसेल. पक्ष संघटनेत 70 टक्के वाटा नव्या चेहऱ्यांना देण्याची गरज असल्याचं सांगण्यात आला असून 35 च्या पुढच्या कार्यकर्त्यांनी आता राज्य पातळीवर काम करण्याचं आवाहन पवारांनी आढावा बैठकीत केलं. विरोधकांना मिळालेल्या यशामागे संघाच्या प्रचाराचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.