मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ करणे मुंबईच्या माजी महापौरांना चांगलेच महागात पडले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थानातील प्रचारावेळी भाजपच्या बॅनरवर उल्लेख करण्यात आलेल्या ‘हिंदू ह्रदय सम्राट’ शब्दावरुन माजी महापौर दत्ता दळवी यांनी या मेळाव्यात शिवीगाळ केली होती.
आज सकाळी 8 वाजता पोलिसांनी दत्ता दळवी यांना अटक केली. दळवी यांना त्यांच्या विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. दळवी यांना भांडूप येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ, ठाकरे गटाचा बडा नेता अटकेत
- Advertisement -