राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
अजित पवार यांनी पत्नीलाच उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीत नाराजीचा सूर उमटला आहे. सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे पवार घराण्यात आता तिघांकडे खासदारकी तर दोघांकडे आमदारकी अशा पाच जणांकडे पदे आली आहेत.
प्रफुल पटेल यांनी राजीनामा देऊन पुन्हा राज्यसभा निवडणूक लढविल्याने ही जागा रिक्त झाली होती. अवघ्या नऊ दिवसांपूर्वी लोकसभेला पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवून मागील सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध मागील दाराने का असेना, त्यांची संसदेत पोहोचण्याची इच्छा पूर्ण झाली. अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पत्नीलाच राज्यसभेवर संधी दिल्याचे पक्षाच्या नेतेमंडळींच्या फारसे पचनी पडलेेले नाही.
राज्यसभेसाठी आपली इच्छा होती, पण शेवटी पक्षाचा निर्णय मान्य करावा लागतो. – छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस