Saturday, June 14, 2025

अबकी बार ‘मविआ’ 225 पार….शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 225 पेक्षा जास्त जागा येतील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. मुंबईच्या वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये ते बोलत होते. महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. मात्र चित्र बदलण्याच्या दृष्टीनं लोकसभा निवडणुकीत मतदारांनी कौल दिला, ही तर केवळ सुरूवात आहे, महाराष्ट्राचं राजकारण बदलेल अशी अपेक्षा असल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बोलताना म्हणाले की, “महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे, चित्र बदलवण्याच्या दृष्टीनं लोकसभेत मतदारांनी निकाल दिला. 48 पैकी 31 लोकांना शक्ती देऊन वेगळा इतिहास घडवला. राष्ट्रवादीच्या 8 लोकांना निवडून दिलं, ही सुरुवात आहे, 288 जागा आहेत, त्या जागांमधील 225 पेक्षा जास्त जागा निवडून येतील, महाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची अपेक्षा आहे, कष्ट करणार, शक्ति देणार, राज्य आणुया, सत्तेत येत लोकांच्या जीवनात बदल आणण्याचा प्रयत्न करूयात, उद्योजक, व्यापारी असेल कोणताही घटक असेल देशात एक शक्तिशाली महाराष्ट्र राज्य निर्माण करूयात.”

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles